सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण व सो .क्ष .पा .सामाजिक आणि शैक्षणिक संस्था , शांति निवास (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षा ज्ञातीतील पाल्यांसाठी शैक्षणिक स्पर्था ( चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ति स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा ), त्याच प्रमाणे बंधु भगिनींसाठी पाककला व विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ह्या स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० पर्यंत कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे आयोजित करण्यात आले.
स्पर्धेचे उदघाट्न श्री. रमेश विठ्ठल नाईक (सो. क्ष. पा. माझी सचिव) ,सौ. पल्लवी पराग म्हात्रे (सो. क्ष. पा. माझी उपाध्यक्षा ), श्री. विकास माळी (सो. क्ष. पा. सचिव) , श्री. मनोज म्हात्रे, श्री. मनोज पुरो, श्री. सुनील माळी यांच्या हस्ते झाले.












