Events

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण व सो .क्ष .पा .सामाजिक आणि शैक्षणिक संस्था , शांति निवास (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षा ज्ञातीतील पाल्यांसाठी शैक्षणिक स्पर्धा, त्याच प्रमाणे बंधु भगिनींसाठी पाककला व विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ह्या स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन कै . रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे आयोजित करण्यात येते. तसेच विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव व विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला जातो, बक्षीस समारंभाला शालांत परीक्षेत इयत्ता १० वी , १२ वीत ७०% व अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच महाविद्यालयीन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो.