कै. रामकृष्ण आत्माराम पाटीलचिंबलथली , नागांव
सोमवंशी क्षत्रीय पाठारे ज्ञाती समाजाबद्दल अस्था असणारे, समाज आपला आहे तो नेहमी एकत्रित रहावा म्हणुन समाज कार्याची तळमळ असणारे, दानशुर समाजाचे पहिले भुदान करणारे कै .रामकृष्ण आत्माराम पाटील हे ठरले, त्यांनी उरण सो.क्ष.पा. समाजाला ११ गुंठे जागा समाजमंदिर बांधण्यास दिली. समाज त्यांचा नेहमी ऋणी राहील,

तसेच ते माझी पोलीस पाटील म्हणुन नागांव, केगांव, म्हातावली, फुंडे, चाणजे व बोकडवीरा या सर्व ठिकाणी काम करत होते, त्याच बरोबर जन्म नोंदणी व सर्वेक्षणाचे कार्य करत होते.

कै. परमपुज्य ॐ दत्त ठाकुर महाराज गाणगापूर
समाज भुषण पुरस्कार – २०२३
रायगड जिल्ह्यातील सागरतीरावर असणाऱ्या उरण तालुक्यात परमपूज्य श्री ठाकूर महाराज ह्यांच्या जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी सागर किनाऱ्यावर खेळात असताना त्यांना एका मोठ्या खेकड्याची अखंड कवची सापडली ज्यावर निरनिराळ्या रंगांचे ठिपके होते . त्या ठिपक्यांचा “नारायण” हा शब्द तयार झाला होता. त्यांच्या आयुष्यातील पहिला मंत्र त्यांना सागराकडून मिळाला. राजस्थान येथील गुरुशिखरावर एका मंदिरा बाहेर असलेल्या एका घंटेचा नाद श्री महाराजांनी दीर्घकाळ केला असता “ॐ दत्त ” मंत्रध्वनी त्यांच्या कानी पडू लागली. ॐ दत्त परिवाराचे बीज गुरुशिखरावर पेरले गेले.

श्री महाराजांनी अनेक दानधर्म केले, अनेक मंदिराचे जीर्णोद्धार त्यांच्या हस्ते झाले. गाणगापूर या त्यांच्या कर्मभूमीत त्यांनी अनेक धार्मिक कार्य केलीत . दीनदुखी जणांची सेवा करणे , औषधोपचाराची वावस्था करणे , शैक्षणिक मार्ग सुलभ करणे , माधुकरी देणे, अन्नदान, वस्त्रदान, पत्रदान , सीमेवर लढता-लढता शहीद झालेल्याच्या परिवाराला मदत अशी अनेक कार्य त्यांनी स्थापन केलेल्या “श्री ठाकूर महाराज सेवाकार्य ट्रस्ट “, “श्री ठाकूर महाराज ॐ दत्त ट्रस्ट “, “दत्ताई प्रतिष्ठान ” तर्फे केले जातात .

कै. अशोक पानसरें बोरी
माझी अध्यक्ष, श्री अशोक पानसरे यांचा जन्म पावभात उरण- बोरी मध्‍ये झाला, कामा निमित आई वडिल दादर, हिंदू कॉलनी मध्‍ये स्‍थानिक झाले, हिंदू कॉलनींत अशोक काकानीं समाज कार्याचा धडा गिरवला, अनेक सामाजिक कार्यात हिरहीने भाग घेतला.मोठ्या भावाबरोबर जाऊन वनमाळी हॉल मध्ये ज्ञाती बंधु भगिनीं साठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले.

नोकरीतुन निवृत्ती झाल्यावर, उरण बोरी येथे स्वताचे घर बांधले, तसेच उरण ज्ञानी बंधु भगिनींना एकत्रित करायचा विडा घेतला. या कामात तात्या पुरो यांना सोबत घेऊन उरणच्या प्रत्येक गावात जाऊन संपर्क केला. उरणच्या सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे ज्ञानी समाजाचे एक समाजमंदिर बांधण्याचा ध्यास घेतला व ते बांधले, यासाठी उरण ,अलिबाग , मुंबई व ठाणे मधुन देणगी जमा करून नागांव चिंबलथली येथे बंधु कै.रामकृष्ण आत्माराम पाटील यांच्या कडुन समाजासाठी मिळालेल्या जमिनीवर समाज्याची भव्य वास्तू उभी केली, त्यांच्या या व अश्या अनेक कार्याला आमचा त्रिवार प्रणाम!

कै.द्वारकानाथ (तात्या) भिकाजी पुरोबोरी
समाज भुषण पुरस्कार – २०२३
माझी उपाध्यक्ष कै. द्व्राकनाथ भिकाजी पुरो उर्फ तात्या, गावातील नागरीक त्यांना नमस्कार काका , नमस्कार आजोबा या नावानेही ओळखायची, उंच आणि धिपाड व्यक्तिमत्व असलेले तात्या गावातील समाजकार्यात नेहमी पुढारकर घ्यायचे, गावातील पाणी , स्वच्छता , लाईट व गटार सफाई वेळेवर नाही केले की नगरपालिकेत जाऊन आपल्या भारदस्त आवाजाने नगरसेवक व कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाची जाणीव करून काम करून घ्यायचे.

सोमवंशी क्षत्रीय पाठारे समाज एकत्रीत करण्यास त्याचा मोठा वाटा आहे . मनामध्ये कोणतेही क्लिमीष न ठेवता समाजमंदिर बांधण्यास लागणारी देणगी मागताना कधी माघार घेतला नाही, देणगीदारान कडे वारंवार जायचे आणि दिणगी घेऊनच यायचे. कै . अशोक पाणसरे यांच्या बरोबर आखा उरण चालत फिरायचे व समाजाचे व समाजमंदिराचे महत्व पटवुन द्यायचे. अश्या समाजसेवकास आम्ही मानाचा मुजरा करतो!

श्री . सदानंद काशीनाथ पाणसरे बोरी पाणसरेआळी
माझी कोषाध्यक्ष श्री सदानंद पाणसरे उर्फ सदाआण्णा, समाजाला आलेला पैसा समाजकार्यात व्यवस्थित रहावा म्हणुन प्रत्येक पैशाचा हिशोब रोख ठेवणारे सदाआण्णा याचा समाजमंदीर बांधण्यास मोठा वाटा आहे, त्यांच्या सारख्या निस्वार्थी व एकनिष्ठ कार्यकर्त्या मुळेच उरण सोमवंशी क्षत्रीय पाठारे ज्ञाती समाज मोठा झाला. उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै.काशिनाथ धोंडु म्हात्रेकेगांव
समाज भुषण पुरस्कार – २०२४
माझी सल्लागार कै.काशीनाथ म्हात्रे उर्फ के.डी म्हात्रे, प्रत्येक कार्याचा पाठपुरावा करून कार्य पूर्ण करणारे, सर्वांशी प्रेमाने व आपुलकेने विचारपुस करणारे सर्व कार्यकर्त्याचे लाडके के.डी .काका होते. कधी कोणाला ओरडत नसे, समाजाचे काम आहे हे सर्वाना समजावुन व प्रेमानेच केले पाहिजे अशी त्याची विचारसरणा होती, अशा विचारांनीच समाज मोठा होतो असे त्याचे म्हणणे होते, व तसे त्यांनी करून दाखवले, उरण सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे समाजमंदीर उभारण्यास त्याचाही मोठा वाटा आहे अश्या कार्यकर्त्याला आमचा कोटी कोटी प्रणाम!

कै. हरिभाऊ जगनाथ म्हात्रेकेगांव
समाज भुषण पुरस्कार – २०२३
उरण सोक्षपा समाजाचे पहिले अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. लक्ष्मण अण्णा पाठारेनागांव
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. अनंत बाबाजी म्हात्रेविनायक
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. शशिकांत मुकुंद म्हात्रेबोरी
समाज भुषण पुरस्कार – २०२४
मंत्रालयात पोलीस आयुक्तात उच्च कार्यकारी अधिकारी म्हणुन निस्वार्थी पणे काम केले, १२ वर्षे मुबई पोलीस अधीक्षक (एकूण ३८ वर्षे नोकरी सेवेत ), अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरण (swimming ) स्पर्धेत पारितोषिक मिळविले. वयाच्या ८५ वर्षा पर्यंत जलतरण छंद जोपासला, व अनेक नवतरुण जलतरुणपटुन शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले.

उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, तसेच समाजातील भगिनींना प्रोसाहित करण्यासाठी हळदीकुंकू समारंभ व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी योगदान देऊन प्रोसाहित केले. उरण सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे समाजमंदीर उभारण्यास त्याचाही मोठा वाटा आहे अश्या कार्यकर्त्याला आमचा दंडवत प्रणाम!

कै. भालु पानसरेबोरी
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै मनोहर भिमनाथ माळीनागांव काठेआळी
समाज भुषण पुरस्कार – २०२३
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. मोरेश्वर पुरवविनायक
समाज भुषण पुरस्कार – २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री शेखर द्वारकानाथ म्हात्रेबोरी
समाज भुषण पुरस्कार – २०२४
स्वातंत्र सैनिक कै. नानासाहेब उर्फ डी .बी .म्हात्रे यांचे सुपुत्र श्री. शेखर म्हात्रे, लहानपणा पासुन समाज सेवेची आवड असलेले, नागरिकांचे आवडते लोक प्रतिनिधी झाले, नगरसेवक व उरणचे नगराध्यक्ष म्हणुन २५ वर्षे उरणच्या नागरिकांची सेवा केली, हे करत असतानाच सो.क्ष पा उरणचे अध्यक्ष म्हणुन समाज ज्ञातीचे कार्य केले, स्वतः खर्च करून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व समाजाच्या सभा स्वतःच्या घरी घेतल्या, समाजाचे कार्य सतत चालु राहावे म्हणुन सदैव धडपड करत समाज बंधू भगिनींना एकत्रीत ठेवण्याचे कार्य केले, अशा समाज सेवकाला आमचा लक्ष लक्ष प्रणाम!

श्रीमती. रजनी ताई वारिक

बोरी

श्रीमती सुशीलाताई पानसरे

बोरी

श्रीमती लताताई पानसरे

बोरी

श्री. श्रीधर वासुदेव घरत – कुंभारवाडा
समाज भुषण पुरस्कार – २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री. यशवंत ज्ञानेश्वर राणे – कुंभारवाडा
समाज भुषण पुरस्कार – २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले,  उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!