सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण व सो .क्ष .पा .सामाजिक आणि शैक्षणिक संस्था , शांति निवास (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षा ज्ञातीतील पाल्यांसाठी शैक्षणिक स्पर्था व विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ह्या स्पर्धेचा व कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे आयोजित करण्यात आला. तसेच १० वी, १२ वी, पदवी व उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, त्याच प्रमाणे कला, क्रीडा, सामाजिक, उदयोग व राजकीय क्षेत्रात ज्यांनी नाव लौकिक केले आहे अशांचा सत्कार व सो. क्ष. पा. समाजभुषण म्हणुन ज्ञाती समाज बंधु – भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.